Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला – आचारसंहिता जारी

Mar 16, 2024

आज  निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची  घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमणे एकूण 7 टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिला मतदान होणार आहे. दुसरा टप्पा – 26 एप्रिल, तिसरा टप्पा – 7 मे, चौथा टप्पा – 13 मे, पाचवा टप्पा – 20 मे, सहावा टप्पा – 25 मे आणि सातवा टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होईल.

निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं की, देशभरात एकूण  97 कोटी मतदार आहेत. ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकिय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे. ही निवडणूक निःपक्ष पणे होईल. प्रत्येक निवडणूक ही एक परीक्षा असते.

आदर्श आचारसंहितेत या गोष्टींना बंदी

1. सार्वजनिक उद्घाटन, पायाभरणी समारंभ 2. नवीन कामे स्वीकारणे 3. शासनाच्या कामगिरीचे होर्डिंग्ज लावता येणार नाही 4. संबंधित मतदारसंघात कोणताही शासकीय दौरा होणार नाही. 5. सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जाणार नाहीत. 6. शासनाचे यश दर्शविणारे होर्डिंग काढले जातील. 7. सरकारी इमारतींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास बंदी असेल. 8. सरकारच्या उपलब्धी असलेल्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरात करता येणार नाही. 9. कोणत्याही प्रकारची लाच किंवा प्रलोभन टाळा. देऊ नका, घेऊ नका. 10. सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घ्या. तुरुंगात जायला तुमची एक पोस्ट पुरेशी आहे. त्यामुळे कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी आचारसंहितेचे नियम काळजीपूर्वक वाचा.

अजून बातम्या वाचा..

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]