मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात एफ.सी.आय रोड येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम रक्षा व हनुमान चालीसा चे सामुहिक रित्या पठन करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मंदिरात आकर्षक सजावट रोहन अग्रवाल, जय बेदमुथा व अक्षय अग्रवाल हयांनी केली, कार्यक्रमाचे संयोजन अँड. सुनील सरोदे , सुनील वनवे,हेमंत पेंडसे,जय मारु, नैतिक अग्रवाल, साईली पेंडसे , सौ. बागरेचा, अँड. प्रिती सरोदे, अँड. रमेश अग्रवाल, मित शिंदे, हर्षद गाडे , जय बधान ह्यांनी केले. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व थरातील नागरिक उपस्थित होते.