loader image

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

Jun 21, 2024


नांदगाव – मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व २१ सूर्य नमस्कार अखंड पणे ४५ मिनिटात पूर्ण केली
याची
वल्डरेकाॅर्डस बुक आँफ इंडिया ने या योगाची नोंद घेतली घेतली आहे.
योगासने सूर्यनमस्कार म्टलकी चादर,चटाई वर किंवा जमिनीवर
केली जातात पण नागरीकाना योगाचे महत्व पटावे व योगाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला बाळू मोकळ यांनी मायनस दहा डिग्री सेल्सिअस वर म्हणजे चक्क बर्फाच्या लादीवर बसून तब्बल ४५ मिनीटे योगासने व सूर्य नमस्कार अखंडीत पणे पुर्ण करणारे ते पहिले व्यक्ती आहे.
दि २० जुन रोजी मोकळ यांनी
51 योगासने व 21 सुर्य नमस्कार बर्फाच्या लादीवर बसून उभेराहुन झोपुन ही अवघड योगासने पूर्ण केली.
दरम्यान मोकळ यांनी
या पुर्वि 2019 मध्ये मोटार सायकलवर योगासने व दोन हजार आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 यावर्षी कडूनिंबाच्या झाडावर अकरा सुर्य नमस्कार व 51 योगासने केली होती यावर्षी देखील त्यांनी नागरीकानी योगसाधना व प्राणायाम साधनेकडे वळावे व योगाचा प्रसार व्हावा या अनुषंगाने बर्फाच्या लादीवर योगासने केली. या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका सीमा ताजनपुरे, दिलीप थोरात सुखदेव मोकळ ,लता मोकळ, गायत्री मोकळ, गोविंद बोराडे ,दिलीप थोरात, विलास थोरात ,रोहिणी थोरात, नलिनी कड, नासिर खान उपस्थित होते
: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी योगदर्शन योग केंद्र थोरात फार्म नाशिक येथे मायनस दहा डिग्री अंश सेल्सिअस बर्फांच्या चार लाद्यांवर 51 योगासने व 21 सूर्यनमस्कार केलेत मोकळ गेल्या बावीस वर्षापासून योग प्रचार व प्रसाराचे काम करत आहेत ते योग विद्या गुरुकुल तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथील योगशिक्षक आहेत महाराष्ट्र शासनाचा निसर्गोपचार अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे कवी कालिदास युनिव्हर्सिटी रामटेक येथून त्यांनी एम ए योगशास्त्र पदवी मिळविले आहे. सध्या ते एमजीएम कॉलेज संभाजीनगर येथे आपला पीएचडीचा अभ्यासक्रम करत आहेत आत्तापर्यंत मोकळ यांनी हजारो नागरीकाना योगाचे शिक्षण प्रशिक्षण दिले व हजारो योग शिक्षक घडविले .त्यांनी आतापर्यंत अनेक वृद्धाश्रम, आदिवासी पाडे, आश्रम शाळा, शाळा,कॉलेज महाविद्यालय तसेच अनेक संस्था आर्मी,एअरफोर्स,भारत सरकार सूचना व प्रसार मंत्रालय या ठिकाणी योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे तसे तर श्री मोकळे यांना एक कल्पना सूचना मागे बघितले तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण ग्रंथांमध्ये बघतो की आपले कृषीमुनी संत महात्मे हिमालयामध्ये जाऊन साधना करताना आपण बघितले व ऐकले आहे अशाच प्रकारचा एक उत्सुकता माझ्या मनामध्ये तयार झाली.
.प्रतिक्रिया: आपण हिमालयात न जाता बर्फावर योगासन करू शकतो का या दृष्टीने प्रयत्न केले यासाठी मी गेल्या एक वर्षापासून याचा अभ्यास करत होतो यासाठी काही दिवस जमिनीवर असणे केले थंडीमध्ये फरशीवर असं केले त्याचबरोबर ग्रंथांमध्ये काही आसन व प्राणायाम असा देखील उद्योग उपयोग सांगितलेला आहे त्या अनुषंगाने आपणास कुठले असून प्राणायाम उपयुक्त ठरू शकतात या अनुषंगाने स्वतःची तयारी केली खरंतर ही कल्पना सूचना म्हणजे कोविड काळामध्ये 2019 मध्ये देखील मोटरसायकलवर 51 योगासनेय आक्रमणास कार केली होती मागील वर्षी जागतिक योग दिनाच्या 2023 मध्ये देखील मी निंबाच्या झाडावर नांदगांव फुलेनगर येथे नाना मोकळ यांचे शेतवरील झाडावर 51 असणे व 11 सूर्यनमस्कार केली यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्व संध्येला बर्फावर 51 योगासने व 21 नमस्कार केले हे करण्यामागे माझा प्रामाणिक उद्देश म्हणजे योगाचा प्रचार व प्रसार समाजामध्ये कसा होईल व योगसाधनेकडे समाज जास्तीत जास्त आकर्षित होऊन आपल्या शरीर स्वास्थ्य व मन स्वस्त त्यासाठी कसा उपयोग करून घेईल हा माझा प्रयत्न आहे तरी असा प्रयत्न कोणी करू नये कारण यापासून आपणास दुखापत होऊ शकते ; बाळू मोकळ योग प्रशिक्षक नासिक

मोकळ यांनी थोरात फार्म. नाशिक येथे प्रात्यक्षिके सादर केले या प्रात्यक्षिका प्रसंगी नगरसेविका सीमा ताजने नगरसेवक राजेद्रं ताजनपूरे सर रमेश भवर दिलीप थोरात सुखदेव मोकळ सौ गायत्री मोकळ लता मोकळ नलिनी गड विलास भाऊ थोरात रोहिणी थोरात गोविंद बोराडे डॉक्टर हर्षल मोकळ नासिर खान. उपस्थित होते. या सर्वांनी या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक केले.
बाळु मोकळ यांनी केलेल्या आसनांची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया
यांनी घेतली असून त्यांना लवकरच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया
विशेष प्रतिनिधी
संजय नार्वेकर
सुषमा नार्वेकरक्ष यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.


अजून बातम्या वाचा..

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
.