Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन

Dec 12, 2024

 

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “शांतता… पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाचन आणि शैक्षणिक संस्कृतीला बळकटी करण्यासोबत जगात पुण्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १४ डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी जनजागृती म्हणून आजचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे असे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ आर एस लोखंडे, यांनी विशद केले. या उपक्रमात दिलेल्या वेळेत ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी उपलब्ध असलेले किंवा आपल्या आवडीचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र क्यूआर कोड च्या माध्यमातून अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. देविदास सोनवणे, प्रा. डॉ. पी जी आंबेकर, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ) नांदगाव शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या कांदा वखारीत पाच फुट क्रोबा जातीचा साप

(बघा व्हिडीओ) नांदगाव शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या कांदा वखारीत पाच फुट क्रोबा जातीचा साप

शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या येवला रोड येथील कांदयाच्या वखारीत कांदे गोणी भरायचे...

read more
मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

मनमाड : ( योगेश म्हस्के) मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये...

read more
श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील ११८ विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपनीत निवड

श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील ११८ विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपनीत निवड

चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निकमध्ये अध्ययन...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे महाराष्ट्र मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपा च्या ऐतिहासिक यशाचा विजयजल्लोष

मनमाड शहर भाजपा तर्फे महाराष्ट्र मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपा च्या ऐतिहासिक यशाचा विजयजल्लोष

काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातून भाजपा चे राज्यसभेचे नेते व केंद्रीय मंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]