loader image

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Jan 7, 2025


विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्या ला माल्यार्पण करून करण्यात आला यावेळी मंचावर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा सदस्य नोंदणी अभियान नांदगाव विधानसभा सह संयोजक नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी , नारायण पवार भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, जिल्हा चिटणीस सौ. अनिता इंगळे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत , भाजपा कामगार आघाडी जि अध्यक्ष पंकज खताळ भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनीताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सदस्य नोंदणी ची माहिती दिली यावेळी भाजपा चे नवीन दोनशे पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्यात आली. भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी धर्म,जातपात लिंग भेद न करता युवा, महिला, जेष्ठ नागरिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यवसायी, विध्यार्थी, iकामगार,शेतकरी, कारागीर अश्या सर्व स्तरातील नागरिकांना भाजपा च्या विचार धारे शी जोडावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी केले या वेळी उमेश वडनेरे व नाना महाडिक यांनी भाजपा ची नवीन सदस्यत्व घेऊन जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते भाजपा त प्रवेश केला या या कार्यक्रमाला भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अकबर शहा,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर मन की बात जि संयोजक दीपक पगारे दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी जि उपाध्यक्ष सुनीता वानखेडे शहर सरचिटणीस व सदस्य नोंदणी शहर संयोजक आनंद काकडे सरचिटणीस मूर्तिजा रस्सीवाला, अक्षदा पगारे नारायण जगताप, शहर उपाध्यक्ष गणेश कासार,कैलास देवरे, गोविंद सानप, मुकेश वेलन्नू, किरण उगलमूगले संजय गांगुर्डे, जयश्री कुंभार,गांगुर्डे ताई,शहर चिटणीस संदीप परदेशी अविनाश पगारे युवा मोर्चा चे रोहन अग्रवाल आदी प्रमुख पदाधिकाऱ्यां सह शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, नोंदणी अभियान प्रमुख शहर प्रमुख आनंद काकडे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.