loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

Mar 29, 2025


मनमाड – BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 19 वर्षातील संघाची निवड चाचणी नोव्हेंबर 2024 मध्ये पार पाडण्यात आली.
या निवड प्रक्रियेत मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु हसन शेख , चिराग निफाडकर , रुषी शर्मा , दक्ष पाटिल व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा संघाच्या संभाव्य खेळाडुंच्या यादित निवड झाली होती. त्यानंतर हे निवड झालेले खेळाडु आत्मा मलिक क्रिकेट ग्राउंड शिर्डी व आर सी पटेल काॅलेज ग्राऊंड शिरपुर येथे निवड चाचणी खेळण्यास पात्र झाले. 08 निवड चाचणी सामण्यात आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन या खेळाडुंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर नंदुरबार अंडर 19 जिल्हा संघात निवड निश्चित केली व नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघाचे सदस्य झाले. चिराग निफाडकर हा नाॅर्थ झोनसाठी निवडला गेला.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने एप्रिल महिन्यात खेळवले जाणार असुन हे सर्व खेळाडु जिल्हास्तरीय सामने खेळतील. मनमाडचे हे खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन उच्चस्तरीय स्पर्धेत करणार आहेत.
मनमाडच्या खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची 19 वर्षातील महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिली जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे सराव करत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले. या सर्व खेळाडुंना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.