loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात एक दिवसीय स्टार्टअप टॉक सिरीज संपन्न

Mar 4, 2026


महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक – २८-०२-२०२६ रोजी महाविद्यालयात Centre for Innovation, Incubation & Enterprise (CIIE) च्या वतीने एक दिवसीय स्टार्टअप टॉक सिरीज आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर माननीय प्राचार्य – डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य- डॉ. बी. एस. देसले, कुलसचिव- श्री. समाधान केदारे, कार्यालय अधीक्षक – श्री. एल. के. निकम, समन्वयक – डॉ. आर. एस. काळे व मान्यवर अतिथी- श्री. निलेश अरविंद दराडे (उद्योजक) व सौ. रक्षा दिनेश बेडमुथा (उद्योजीका) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना CIIE चे समन्वयक डॉ. आर. एस. काळे यांनी केली, त्यात त्यांनी कार्यक्रमाचे उदिष्टे व स्वरूप सांगितले. कार्यक्रमचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के. एस. ठाकरे यांनी केले. श्री. निलेश अरविंद दराडे आणि सौ. रक्षा दिनेश बेडमुथा यांनी विद्यार्थ्यांमध्ये, उद्योजकता व स्टार्टअप संस्कृती विकसित करण्याच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. तसेच त्यांच्या यशाच्या प्रवासाचे अनुभव सांगितले. त्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात नवकल्पना, संशोधनाभिमुखता व उद्योजकीय दृष्टिकोन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. श्री. निलेश अरविंद दराडे यांनी उद्योजकता, पायाभूत सुविधा विकास व स्टार्टअप संधी याविषयी व्यवहारिक मार्गदर्शन केले. सौ. रक्षा दिनेश बेडमुथा यांनी आर्थिक नियोजन, व्यवस्थापन धोरणे व शाश्वत व्यवसाय विकास याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर करून नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले. डॉ. आरती छाजेड यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. आर. एस. काळे यांनी आभार मानले. या प्रसंगी विध्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तीत होते. डॉ. पवनसिंग परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसाठी सदरील कार्यक्रम अत्यंत संवादात्मक झाला असून विद्यार्थ्यांना नवकल्पक व्यावसायिक संकल्पना व स्टार्टअप संधी शोधण्यास प्रेरणा मिळाली.
ही एक दिवसीय स्टार्टअप टॉक सिरीज विद्यार्थ्यांमध्ये नवीनता, इनक्युबेशन व उद्योग विकासाला चालना देणारा उपक्रम ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

येवला तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला....

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
* महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनची मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फ़े अभियंता दिन साज़रा*

* महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनची मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फ़े अभियंता दिन साज़रा*

१५/९/२०२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी सर मोक्षगुंडम...

read more
बैल पोळा सणानिमित्त आलेले खडक माळेगाव येथील सैन्य दलातील जवान योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू

बैल पोळा सणानिमित्त आलेले खडक माळेगाव येथील सैन्य दलातील जवान योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू

राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश...

read more
अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन शाखा मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.

अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन शाखा मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दिनांक १५/०९/२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा आणि अल्ट्राटेक सिमेंट...

read more
.