Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलमध्ये ‘प्रकृती दांडिया – सीझन ३’ जल्लोषात संपन्न!

Oct 17, 2026

नवरात्रीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून प्रकृती स्कूल, मनमाड येथे ‘प्रकृती दांडिया – सीझन ३’ या भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उत्साह, आनंद, संगीत आणि नृत्य यांच्या सुरेख संगमाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच मनमाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दांडियाच्या तालावर आणि नवरात्रीच्या सुमधुर गीतांवर उपस्थितांनी मनसोक्त नृत्याचा आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी पोशाख आणि सहभागींचा उत्साह यांमुळे संपूर्ण परिसर नवरात्रीच्या रंगात रंगून गेला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा, एकता आणि सामूहिक आनंदाचे सुंदर दर्शन घडले.

कार्यक्रमात सहभागींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध आकर्षक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट बापलेक जोडी मेहक व उमेश गांधी, रॅम्प वॉक मध्ये प्रथम क्रमांक दूर्वा बडे, द्वितीय क्रमांक देशना लुनावत व गुंजन गोगड, तिसरा क्रमांक रुतवा पटेल यांनी पटकावला.

यावेळी छोट्यांनीही म्हणजेच Genz Group ने आपल्या मधील कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत लिटिल रॉक्स स्टार्स यांनी प्रथम क्रमांक तसेच दांडिया धुरंदर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मोठ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट दांडिया गटाचे प्रदर्शन करताना प्रथम क्रमांक बिंदी बिट्स, द्वितीय क्रमांक जिले जिंदगी आणि तृतीय क्रमांक रंगीला गुज्जूज यांनी पटकावला तसेच सर्वोत्कृष्ट वेशभूषा मान पुरुष गट धनेश चोपडा तर सर्वोत्कृष्ट महिला वेशभूषा अश्विनी बडे यांना मिळाला.

एक सर्वोत्कृष्ट एकल नृत्य सादरीकरण पुरुष गट अंकुर लुनावत आणि यश लोढा यांनी तसेच सर्वोत्कृष्ट एकल नृत्य सादरीकरण महिला गट(solo dance) सौ.पूजा ओस्तवाल यांनी पटकावीला.

सर्वोत्कृष्ट जोडपे( best couple) चा मान हर्षा व अमोल देवरे यांना तसेच सर्वोत्कृष्ट जोडी (best duet)राधा पटेल व वर्षा पटेल यांना तर अद्वितीय पोशाख (unique dress up) पारितोषिक पर्ल आणि जीविका बेदमुथा यांना मिळाले. अशा विविध श्रेणींमध्ये पारितोषिके देण्यात आली. या पारितोषिकांमुळे सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला.

‘प्रकृती दांडिया – सीझन ३’ हा केवळ नृत्याचा कार्यक्रम न राहता शाळा, पालक आणि समाज यांना एकत्र आणणारा स्नेहबंधाचा उत्सव ठरला. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सहकार्यामुळे या सोहळ्याने आनंदाच्या अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या. कार्यक्रमादरम्यान तौसीफ पठाण हे मंतशा पठाण आणि सरफराज पठाण यांचे पालक यांनी शाळेच्या कार्याचा गौरव करून शाळेला सरस्वती मातेची सुंदर मूर्ती भेट दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व इतर सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी सौ सुप्रिया जैन मॅडम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच कार्यक्रमाचे परीक्षण शाळेच्या नृत्य शिक्षिका सौ प्राजक्ता अचालिया मॅडम आणि कु.स्नेहल गवई मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक सौरभ जैन सर यांनी उपस्थित पालक, सहभागी, मनमाडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आयोजन समितीचे मनःपूर्वक आभार मानून केली.

अजून बातम्या वाचा..

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]