loader image
[ays_poll id=7]

पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी पेढीवर आयकर विभागाचे छापे!

Oct 21, 2021


आशिया खंडातील कांदयाची प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार कांदा व्यापारी पेढीवर आज आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. याचा परिणाम त्वरित इतर बाजार समित्यांवर दिसून आला  असून जिल्ह्यातील इतर बाजार समिती मध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली असून व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नवीन खरीप कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जुन्या उन्हाळी कांदयाला चांगला दर मिळत होता. असे असतानांच आयकर विभागाने छापेमारी चालू केल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून आयकर विभागाने कांदा खरेदीच्या पावत्या, विक्रीची बिले, वखारीतील कांदा स्टॉक इ. कागदपत्राची चौकशी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

विधी सेवा प्राधिकरण सेवा अंतर्गत मनमाड नगरपालिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..

विधी सेवा प्राधिकरण सेवा अंतर्गत मनमाड नगरपालिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..

 मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश यांचे आदेशाने नांदगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती व मनमाड...

read more

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची आमदार कांदे यांची मागणी!

महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना शासकीय नोकरीत सामावून...

read more
.