Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

नमन एज्युकेशन संचालित रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न

नमन एज्युकेशन संचालित रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न

आषाढी एकादशी निमीत्त शहरातील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये...

read more
एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी निमीत्त पायी दिडीं सोहळा पार

एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी निमीत्त पायी दिडीं सोहळा पार

नांदगाव : तांदुळवाडी ता . नांदगाव येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था, संचालित....

read more

(बघा व्हिडीओ) आषाढी निमित्ताने बी.जी. दरगुडे शाळेमध्ये साजरा झाला दिंडी सोहळा संपन्न

मनमाड : पंढरीची वारी (आषाढी दिंडी ) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]