नांदगाव :प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील परधाडी शिवारातील परधाडी घाटात एक अनोळखी इसम सुमारे ३५ ते ४० वय असलेला बेवारशी पुरुष मृत आवस्थेत नांदगाव पोलीसाना मिळून आला या मृत व्यक्तीची हत्या की आकस्मिक मृत्यु या संदर्भात तर्कवितर्क व्यक्त होत आहे पण नांदगाव पोलिसांनी घटनेची अकस्मीक नोंद केली आहे .मयत पुरुष हा परधाडी घाटात मिळून आला असून त्याची उंची ५ फुट ५ इंच,वय सुमारे ३० ते ४० वर्षे,रंग सावळा, शरीरबांधा मजबुत,अंगावर आकाशी रंगाचा फुल शर्ट,राखाडी रंगाची फुल जिन् चड्डी, असे वर्णन आहे सदर वर्णनाचा व्यक्ती बेपत्ता असल्यास नांदगाव पोलिसांना संपर्क करावा असे पो नि प्रितम चौधरी, व सा पो नि सुनिल बडे यांनी आवाहन करुन संपर्क करण्याचे म्हटले आहे .
या पूर्वी परधाडी घाटात मृत व्यक्ती सापडल्याच्या घटना घडल्या आहे त शिवाय सदर व्यक्ती बेवारशी असल्याने पोलीस घटनेचा विविध मार्गाने शोध घेत आहे .
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा मराठी अध्यापक...












